आशादीप वस्तीगृहातील अत्याचारप्रकरणी चार सदस्यीय समिती करणार चौकशी


गृहमंत्री अनिल देशमुख यांची विधी मंडळात माहिती

मुंबई : जळगावातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असून चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी 2 मार्च रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. बुधवारी जळगावातील आशादीप वसतीगृहातील मुलींसोबत घडलेल्या अत्याचाराचे पडसाद विधीमंडळात उमटल्यानंतर चार सदस्यांची समिती नेमून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन दिवसात चौकशीचे निर्देश दिले आहेत.

समाजसेवकांनी उठवला होता आवाज
आशादीप वसतीगृहात तरुणींसोबत अश्‍लील प्रकार होत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी करीत तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंगळवारी मंगला सोनवणे यांच्यासह अन्य समाजसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांना व्हिडीओ क्लीप सोपवली होती. या प्रकरणावरून गुरुवारी विधीमंडळात खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि अन्य अन्य सदस्यांनी या प्रकरणी सरकारचा निषेध करून याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार सदस्यीय समिती नेमून दोन दिवसात चौकशी करून अहवाल येईल व यानंतर दोषींवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !