भुसावळ-सुरत व भुसावळ-नंदुरबार विशेष गाडीत जनरल तिकीटानेही करता येईल प्रवास
भुसावळ : पश्चिम मार्गावर धावणार्या भुसावळ-सुरत आणि भुसावळ-नंदुरबार या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये केवळ सुरूवातीला आरक्षीत तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी होती मात्र प्रवाशांच्या सुविधेसाठी आता या गाड्यांमध्ये अनारक्षीत (जनरल) तिकीटावरदेखील प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
रेल्वे प्रवाशांना दिलासा
गाडी क्रमांक 09077/09078 अप-डाऊन भुसावळ-सुरत आणि गाडी क्रमांक 09007/09008 अप-डाऊन भुसावळ-नंदुरबार या विशेष गाडीत केवळ सामान्य श्रेणीचे डबे अनारक्षित (जनरल) मानले जाणार आहेत. गाडी क्रमांक 09077/09078 अप-डाउन भुसावळ-नंदुरबार आणि गाडी क्रमांक 09007/09008 अप-डाउन भुसावल-सुरत गाडीसाठी केवळ सामान्य श्रेणीचे डबे अनारक्षित मानले जातील. गाडी क्रमांक 09077/09078 अप-डाउन भुसावळ-नंदुरबार आणि गाडी क्रमांक 09007/09008 अप-डाउन भुसावळ-सुरत गाडीला मेल एक्स्प्रेसचे भाडे आकारण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 09077/09078 अप-डाउन भुसावळ-नंदुरबार आणि गाडी क्रमांक – 09007/09008 अप-डाउन भुसावल-सुरत गाडीसाठी स्लीपर क्लासचे तीन कोच आरक्षित असतील व उर्वरीत कोच अनारक्षित असतील. सध्या या गाड्यांसाठीच अनारक्षित (जनरल) तिकिटे दिली जातील व या गाड्या वगळता इतर कोणत्याही गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे दिली जाणार नाहीत.

