मनसुख हिरण यांचा मृत्यू संशयास्पद : तोंडावरील मास्कखाली आढळले रूमाल !
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी सापडलेल्या स्कोर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यूनंतर धक्कादायक बाब समोर आली असून मनसुख यांच्या तोंडावर लावलेल्या मास्कमध्ये खूप सारे हातरुमाल सापडल्याने त्यांच्या मृत्यूबाबतचा संशय आणखीन बळावला आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला म्हणाल्या की, आपले पती आत्महत्या करूच शकत नाही. गुरूवारी नेहमीप्रमाणे कांदिवीच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्याने बोलावल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर दुसर्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडल्याचे त्या म्हणाल्या.
तो आलेला कॉल नेमका कुणाचा?
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरण यांनी सांगितल्याप्रमाणे कांदिवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या अधिकार्याने मनसुख यांचा फोन आल्यानंतर ते ठाणे घोडबंदर येथे भेटण्यासाठी गेले मात्र भेटण्यासाठी गेलेले मनसुख हिरण हे पुन्हा घरी परतलेच नाहीत असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले परंतु या प्रकरणात कांदिवली येथे तावडे नावाचा कोणी अधिकारीच नाही असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आलं आहे. त्यामुळे तो अधिकारी कोण? तो अधिकारीच होता का? की आणखीन कोणी? मनसुख यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.







