‘आशादीप’मधील सत्यतेची पडताळणी न करता बदनामी करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा
नऊ संघटनांच्यावतीने जिल्हा दंडधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल
जळगाव : जळगावच्या शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात तरुणींबाबत न घडलेल्या कृत्याबाबत वृत्त व व्हिडिओ काही संघटनांच्या महिला व पुरुष मंडळीने चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी यांना दिल्यानंतर तसेच निवेदनाच्या प्रती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिल्यानंतर राज्यभरात जळगावची बदनामी झाली शिवाय आशादीप महिला वस्तीगृहातील तरुणींबाबत सत्यतेची पडताळणी न करता बदनामी करणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी एकमुखी मागणी नऊ संघटनांच्यावतीने जिल्हा दंडाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याकडे करण्यात आली.
खोट्या वृत्तामुळे जळगाव शहराची बदनामी
जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतीगृहातील आरोप करणारी महिला तिचे मौखिक आरोप, महिला व पुरुष संघटनेने दिलेले निवेदन, यातील तथ्य, सत्यता न तपासता माध्यमांद्वारे ते प्रसिद्ध केले गेले इतकेच नव्हे तर राज्यातील जवाबदार व्यक्तिमत्व असलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व इतर आमदारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव जिल्ह्याला बदनामी करण्याच्या दुष्ट हेतूने विधानसभेच्या सभागृहातदेखील बेजवाबदार पणाने सत्तारुढ पक्षाला बदनाम करण्यासाठी आरोप केलेले आहेत वस्तीगृहात कोणताही अनैतिक प्रकार घडलेला नाही हे विशेष चौकशी समोर सिद्ध झालेले आहे परंतु या खोट्या वृत्तामुळे वस्तीगृहातील 17 तरुणी, जळगाव शहर महिला बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार व विशेष करून महाराष्ट्र व जळगाव पोलिस दलाची बदनामी झालेली आहे. संबंधित व्यक्तींवर बेदरकारपणे निवेदन देणे, बातम्या पसरवणे, संगनमताने आरोप करणे व जळगाव जिल्ह्याची बदनामी करून जिल्ह्यातील तरुण-तरुणींचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हेतू दिसून येतो त्यामुळे संबंधितांवर अत्यंत कडक स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी या नऊ संघटनांनी जिल्हादंडाधिकारी जळगाव यांच्याकडे केली आहे.








यांनी भेट घेत केली जिल्हाधिकार्यांशी चर्चा
जिल्हादंडाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांची शुक्रवारी संध्याकाळी या 9 संघटनांतर्फे निवेदिता ताठे, गजानन मालपुरे व फारुक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. डॉ.राऊत यांच्याशी चर्चा करून त्यांना या नऊ तक्रारी सादर करण्यात आल्या. दरम्यान, डॉ.राऊत यांनी याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र विधी मंडळात 4 मार्च 2021 ला चौकशीची घोषणा केलेली आहे तसेच पी.आर.बी कायद्यानुसार मला असलेल्या अधिकारानुसार काय कारवाई करता येईल ? असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
यांनी केल्या तक्रारी
गजानन पुंडलिक मालपुरे (अध्यक्ष साहेब प्रतिष्ठान व माजी महानगरप्रमुख शिवसेना), निवेदिता ताठे (सदस्य- जिल्हा महिला सल्लागार समिती), फारुक शेख (अध्यक्ष- जळगाव जिल्हा मण्यार बिरादरी), पंकज किसन नाले (अध्यक्ष- जनमत प्रतिष्ठान, जळगाव), अरुण दीपक पाटील (काँग्रेस शहराध्यक्ष जळगाव), कल्पना दिलीप पाटील (पत्रकार संघ- जिल्हाध्यक्ष, जळगाव), अंजली पाटील (ग्रामपंचायत सदस्य, भादली), हर्षाली पांडुरंग पाटील (अखिल भारतीय शाहू ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, जिल्हाध्यक्ष, जळगाव), सरीता माळी-कोल्हे (अखिल भारतीय समता परीषद, जिल्हाध्यक्ष, जळगाव तथा संस्थापिका साहस फाउंडेशन जळगाव) यांनी वैयक्तिक तक्रारी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहेत.