कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा : दोघा संशयीतांना कोठडी
जळगाव : सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना फसवत त्यांच्या नावे वेगवेगळ्या कंपन्या कागदोपत्री चालवून कोट्यवधी रुपयांचा जीएसटी घोटाळा केल्याप्रकरणी मुख्य संशयीत पिंटू इटकरे आणि कैलास भारुडे या दोघांना पथकाने ताब्यात घेतले होते. संशयीतांना नाशिक न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जीएसटी विभागातील वरीष्ठ अधिकारी ब्रिजभूषण त्रिपाठी यांच्या पथकाने ही धाड टाकली होती.
स्टील कंपनीच्या पत्त्यावर सुरू होते मेडिकल
एका स्टील कंपनीच्या जीएसटीच्या पत्त्यावर चक्क मेडिकल सुरू असल्याचे आढळले तर अन्य एकाला आपल्या नावावर स्टील कंपनी असल्याचे माहितच नव्हते. डीजीजीआयच्या पथकाने बुधवारी पहूरमधील कैलास कौतीक भारुडे आणि जळगावमधून पिंटू इटकरे या दोघांना ताब्यात घेतले होते. भारुडे आणि इटकरे हे दोघं नात्याने शालक-मेहुणे आहेत. या दोघांना शुक्रवारी सायंकाळी नाशिक कोर्टात हजर केले असता दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.







