लाखाची लाच भोवली : निरीक्षकासह सहाय्यक निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
पुणे : कामशेत पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी (50), सहाय्यक निरीक्षक प्रफुल्ल प्रभाकर कदम (33) व त्यांचे कर्मचारी महेश विनायक दौंडकर (39) यांना एक लाखाची लाच घेताना पुणे एसीबीच्या पथकाने शनिवारी पकडल्याने पुणे पोलिस दलाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
लाच स्वीकारताच आरोपींना अटक
तक्रारदाराच्या मामावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून संशयीत आरोपीनी जामीनावर से देण्यासाठी सुरूवातीला अडीच लाखांची मागणी करून दोन लाखात तडजोड केली व 6 रोजी आरोपी हवालदार महेश दौंडकर यांनी एक लाखाची लाच स्वीकारताच तिघांना अटक करण्यात आली.








यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पुणे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलिस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अलका सरग, पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलिस निरीक्षक -सुनील बिले, पोलिस नाईक वैभव गिरीगोसावी, पोलिस शिपाई -रतेश थरकार, पोलिस शिपाई गणेश भापकर, पोलिस शिपाई किरण चिमटे, चालक पोलिस शिपाई अभीजीत राऊत, पांडुरंग माळी यांच्या पथकाने यशस्वी केला.