कोरोनाचा फैलाव : जिल्हाधिकार्‍यांसह पोलिस अधीक्षकांची मास्क न लावणार्‍यांविरुद्ध कारवाई


जळगाव : जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेला कोरोनाचा फैलाव पाहता मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्वत: शहरात फिरून कारवाई केली. जिल्हाधिकार्‍यांनी काही दिवसांपूर्वी नियमांचे उल्लंघण करणार्‍यांवर थेट स्वत: मैदानात उतरून कारवाई केली होती. यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शहरात फिरून विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई केली. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, वाहतूक शाखेचे निरिक्षक देवीदास कुनगर व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. शहरातील चित्रा चौक, गोलाणी मार्केट परीसरासह अन्य भागांमध्ये कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !