रीक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास परवान्याचे होणार निलंबन


जळगावचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही

जळगाव : जळगाव शहरातील ज्या ऑटो रीक्षा चालकांनी उप प्रादेशिक परीवहन कार्यालयाकडून प्रवासी वाहतुकीसाठी परवाना घेतला आहे त्यासर्व ऑटोरीक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करतांना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवाना धारक ऑटो रीक्षाला मोटर वाहन नियम 119 व 137 अन्वये इलेक्ट्रॉनिक्स मीटर असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे ते सुस्थीतीत असणेदेखील बंधनकारक आहे. कुठल्याही परीस्थितीत परवाना अटीने उल्लंघण करता येत नाही. एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देऊ असे म्हटल्यास रीक्षा चालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य असून ही बाब कायदेशिर आहे परंतु उप प्रादेशिक परीवहन कार्यालय, जळगाव येथे शहरातील अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे की, रीक्षा चालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात व ही बाब रीक्षा परवान्याचे उल्लंघण करणारी असल्याचे जळगावचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !