एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली : पुण्यात हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर


पुणे : एमपीएससी परीक्षा जवळ आली असताना अचानक ठाकरे सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्याने पुण्यात हजारो विद्यार्थी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार असलीतरी कोणतीही पूर्वकल्पना न देता सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे एमपीएससीची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.

सरकारचं धोरण चुकीचे : पडळकर
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारने आतापर्यंत पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे ते म्हणाले.









कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
येत्या 14 मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !