रेखा जरे हत्याकांप्रकरणी पत्रकार बाळ बोठे अखेर जाळ्यात !
अहमदनगर : पत्रकार बाळ बोठे याला अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून अटक केली आहे. तब्बल साडेतीन महिन्यांपासून आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध सुरू होता. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा बोठे यांच्यावर आरोप आहे. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकर्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र पसार झाला होता.