अरे देवा ! : सहा रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 979 रुग्ण आढळले
जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 70 हजार 627 वर : एकाच दिवसात 667 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे तब्बल 979 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1444 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 70 हजार 627 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 61 हजार 602 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर रविवारी एकाच दिवसात 667 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
रविवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 376
जळगाव ग्रामीण 11
भुसावळ 137
अमळनेर 16
चोपडा 101
पाचोरा 27
भडगाव 32
धरणगाव 82
यावल 12
एरंडोल 92
जामनेर 34
रावेर 14
पारोळा 04
चाळीसगाव 10
मुक्ताईनगर 00
बोदवड 19
अन्य जिल्हा 12

24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 65 व 85 वर्षीय पुरूषाचा व 70 वर्षीय महिलेचा, चोपडा तालुक्यातील 80 वर्षीय महिलेचा, भुसावळ तालुक्यातील 53 वर्षीय पुरूषाचा तसेच चाळीसगाव तालुक्यातील 78 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यातील एक मृत्यू उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, एक मृत्यू अक्क्षोन हॉस्पीटल, एक मृत्यू चोपडा, एक मृत्यू अरुश्री हॉस्पीटल, एक मृत्यू सारा हॉस्पीटल तसेच एक मृत्यू चाळीसगाव येथे झाला.
