धक्कादायक ! : दारू न पाजल्याने केला खून


येवला : दारू न पाजल्याने मजुरांमध्ये वाद होवून सहकार्‍याचाच खून करण्यात आल्याची घटना सोमठाण जोश येथे रविवारी रात्री 10 ते 11 दरम्यान घडली. या घटनेत राजू राठोड (35, रा.जिंतूर, जि.परभणी) या मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयीतांना अटक केली.

दारू न पाजल्यावरून वाद
सोमठाण जोश येथे दारू नाही पाजली या कारणावरून मजूरांनी आपला सहकारी राजू राठोड याच्या डोक्यात पहार, फावडे घालून निर्घृण खून केला. संशयीत दिलीप बाबुराव देवरे (रा.कुराड, ता.पाचोरा, जि.जळगाव), दत्तू विश्वनाथ कोकाटे (रा.कोकणगाव, ता.निफाड), देवराम एकनाथ जाधव (रा.पिंपळगाव बसवंत, ता.निफाड), संतोष ऊर्फ विनायक पवार (रा.हिसवळ, ता.नांदगाव) आदींनी दोरीने हातपाय बांधून त्याच्या डोक्यात हातापायावर लोखंडी पहार, फावडे आदींनी जबर मारहाण केली. यात राजू राठोड याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतदेह घटनास्थळीच झाकून ठेवत सर्व सहकारी रात्रभर या मृतदेहासोबत झोपून राहिले. सकाळी या घटनेची माहिती विहीर मालक तुकाराम विठोबा खरात यांना समजताच त्यांनी तात्काळ तालुका पोलिसांना दिली. याप्रकरणी चौकशीत सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणार्‍या संशयितांना पोलिसीखाक्या दाखविताच खुनाच्या गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. तालुका पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !