नात्याला काळीमा : अल्पवयीन बहिणीवर सख्ख्या भावानेच केला अत्याचार !
चंदीगड : बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना हरीयाणाच्या जींद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याने 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडीतेने आपल्या 14 वर्षीय मोठ्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
अत्याचारातून पीडीता गर्भवती
पीडित मुलीचं वय हे फक्त साडे बारा वर्ष असून पीडित मुलगी साडेसात महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोटात वेदना होत होत्या. याशिवाय तिच्या पोटाचा आकारही वाढला होता. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली. घरात कुणी नसताना मोठा भाऊ वारंवार तशाप्रकारचं दुष्कृत्य करायचा, असं पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

