जळगाव महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईनच होणार


जळगाव : जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवड गुरुवार, 18 मार्च रोजी निवड प्रक्रिया होत असून राजकीय उलथा-पालथींना वेग आला आहे. ही निवडणूक प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावल्याने ऑनलाईनच निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीच भाजपात फूट पडल्याने दुसरीकडे सेनेची मात्र ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन होत असल्याने भाजपने याला विरोध दर्शविला होता. या अनुषंगाने डॉ.विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. ही याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुळकर्णी यांनी फेटाळून लावली. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !