कर्तव्यात कसुरी : दोन पोलिस अधिकार्यांच्या बदल्या
कोल्हापूर : कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस अधिकार्यांच्या तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्या. हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भवड व चंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी झालेल्या अधिकार्यांच्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकार्यांना आपल्या हद्दीत अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करा, अशा सूचना केल्या होत्या; मात्र काही अधिकारी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली होती.