बलात्काराचा प्रयत्न करणार्‍याचे महिलेने गुप्तांग कापले


भोपाळ : बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीचे गुप्तांगच महिलेने कापल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. आरोपी घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना 45 वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ही घटना घडली. आरोपी घरात घुसला तेव्हा महिला आणि तिचा 13 वर्षांचा मुलगा घरात असताना चोर आल्याचे समजून मुलगा भीतीने घरातून बाहेर पळाला. आरोपीने महिलेला मारहाण करत लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षण करताना महिलेने तिथे खाटेखाली पडलेला कोयता उचलला आणि आरोपीचं गुप्तांग कापलं. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली, असं पोलिसांनी सांगितलं आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !