लाच प्रकरणी निलंबीत पोलिस निरीक्षकाला अटक
.पुणे : लाच प्रकरणात निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. न्यायाधीशांना मॅनेज करून फौजदारी खटला रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी महिला एस. भालचंद्र गायकवाड (29) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 14 जानेवारी रोजी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना वडगाव मावळ पोललिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.