पत्नीची हत्या करीत पतीनेही केली आत्महत्या


नवी दिल्ली : बिहारच्या सीवानमध्ये पतीने आधी आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत:ही राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बसंतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसांव गावातील राजेश राय (42) याचे आपली पत्नी रामकली देवी हिच्यासोबत नेहमीच घरगुती वाद व्हायचे व या वादातून सोमवारी आरोपी पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी राजेश याने स्वतःच्या पोटावर वार केले होते. त्याच्या शरीरावर वार केल्याच्या काही खुणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृत दाम्पत्याला चार मुले आहेत. त्यात तीन मुले आणि एक मुलगी आहे. ती मुले आपल्या आजीच्या घरी गेली आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !