फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही : माजी आमदार अनिल गोटे यांची टिका


धुळे : देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली मात्र मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली, अशी खळबळजनक आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रातून केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाटलेल्या नोटा वर्षावर छापल्या होत्या का? असा सवाल गोटे यांनी उपस्थित केला असून फडणवीसांच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीवरुन नुसती नजर फिरवली तरी सर्व लक्षात येईल. आपल्याकडे केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. फडणवीसांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा तुम्हाला काहीएक अधिकार नाही. ती नैतिकताच तुम्ही केव्हाच गमावली आहे, असा निशाणादेखील अनिल गोटे यांनी साधला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !