राज्यात कोरोनाचा कहर : निगेटीव्ह अहवाल असलेल्या प्रवाशांनाच गुजरात राज्यात प्रवेश


नवापूर : राज्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता गुजरात सरकारने याची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्रातून गुजरातमध्ये येणार्‍या नागरीकांना कोरोना चाचणी अनिवार्य केली असून कोरोना निगेटीव्ह अहवाल असलेल्या प्रवाशांनाच गुजरातमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत बुधवारी गुजरात आरोग्य विभागाने काढले आहे. य

जागेवरच दंडात्मक आकारणी
उच्छल पोलिसांनी महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील तपासणी नाक्यावर आरोग्य विभाग व पोलिस दलाचे पथक तैनात करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून गुजरात राज्यात येणार्‍या प्रत्येक वाहनचालकांची तपासणी सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभाग व पोलिस दलाला देण्यात आले आहे. कोरोना रीपोर्ट निगेटीव्ह असल्यास गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे अन्यथा महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छलहून महाराष्ट्रात परत पाठविण्यात येत आहे. गुजरात राज्यातील आरोग्य पथक 24 तास सीमावर्ती भागात वाहन चालकाची थर्मल स्कॅनिंग, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा तपास करीत आहे. तोंडाला मास्क नसल्यास गुजरात पोलिस एक हजार रूपयांचा दंड महामार्गावर वसूल करीत आहे. महाराष्ट्र पासिंग फोर व्हीलर वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. कोरोना रीपोर्ट निगेटिव्ह असल्यानंतरच गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे.जळगाव व धुळे जिल्ह्यातील अनेक वाहनचालकांचे कुठलेही कारण ऐकून न घेता परतीचा प्रवास करावा लागला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !