महाराष्ट्रमधून कर्नाटक राज्यात प्रवासासाठी कोरोना चाचणी अनिवार्य
भुसावळ : भुसावळ विभागातील महाराष्ट्रामधून कर्नाटक राज्यात प्रवास करणार्या सर्व प्रवाशांना आता प्रवासाच्या 72 तास आधी कोरोना आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असून निगेटीव्ह रीपोर्ट असलेल्या प्रवाशांनी प्रवाशांनी चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. गाडी क्रमांक 02780 हजरत निजामुद्दीन वास्को दि गामा, गाडी क्रमांक 02630 हजरत निजामुद्दीन यशवंतपूर, गाडी क्रमांक 06528 न्यू दिल्ली बेंगलोर, गाडी क्रमांक 06524 हजरत निजामुद्दीन यशवंतपूर , गाडी क्रमांक 09302 डॉ.आंबेडकर नगर यशवंतपुर या गाडीने प्रवास करणार्या प्रवाशांना टेस्ट रीपोर्ट सोबत बाळगून गैरसोय टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





