पुणे विभागात पॉवर ट्रॅफिक ब्लॉक : सहा विशेष गाड्या रद्द


भुसावळ : पुणे विभागातील लोनी स्टेशन येथे मेकॅनिकल सिग्नलिंग गेअर्स आणि इलेट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामामुळे पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक 24 ते 26 मार्चदरम्यान घेतला जाणार आहे.  या ब्लॉक मुळे भुसावळ विभागातील विशेष गाडी रद्द करण्यात आल्या. त्यात डाऊन 07313 पनवेल-नांदेड शुक्रवार, 26 रोजी रद्द करण्यात आली. अप  07314 नांदेड-पनवेल गुरुवार, 25 रोजी रद्द करण्यात आली.डाऊन 01417 पुणे-नागपूर गुरुवार, 25 मार्च रोजी रद्द करण्यात आली. अप 01418 नागपूर-पुणे शुक्रवार, 26 रोजी रद्द करण्यात आली.अप 02118 अप अमरावती-पुणे गुरुवार, 25 मार्च रोजी रद्द करण्यात आली. डाऊन 02223 पुणे-अजनी विशेष गाडी शुक्रवार, 26 रोजी रद्द करण्यात आली. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !