लेडी सिंघमची आत्महत्या : आरोपी वनपरीक्षेत्र अधिकारी जाळ्यात


नागपूर : हरीसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करणार्‍या वन परीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला नागपूर रेल्वेस्थानकावर अटक करण्यात आली आहे. विनोद शिवकुमार बंगळूरला जात असल्याची माहिती अमरावती पोलिसांना मिळाली. त्यांनी ही माहिती नागपूर लोहमार्ग पोलिसांना दिली होती. आरोपी रेल्वे गाडी 02296 दिल्ली-बंगळूर एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या तयारीत असताना सकाळी 9.30 वाजता त्यास अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यास अमरावतीला नेण्यात आले.

हे देखील वाचा : लेडी सिंघम वन परीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांची गोळी झाडून आत्महत्या






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !