भुसावळच्या विकासकामांसाठी पावणेचार कोटींचा निधी


पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांना यश : रस्त्यांसह गटारींची होणार कामे ; कामांना मिळाली प्रशासकीय मंजुरी

भुसावळ : भुसावळ शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण, गटारी आणि अन्य कामांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजना आणि नागरी दलित्तेतर वस्ती सुधार योजनांच्या अंतर्गत पावणे चार कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार संजय सावकारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा भरीव निधी मिळाला आहे.

कामांना प्रशासकीय मान्यता
भुसावळ शहरातील रस्त्यांच्या कामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आधीच भरीव निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. या संदर्भात आमदार संजय सावकारे यांनी पाठपुरावा केला. नगरपालिका प्रशासनातर्फे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यातील सहा रस्त्यांच्या कामांना सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2020-21 मधून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात कडू प्लॉट ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्‍या दुभाजकाच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण-मूल्य 70 लाख तीन हजार 470 रुपये, लोणारी मंगल कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग वाय पॉईंट (जॉली पेट्रोल पंप) 33 लाख, 45 हजार 463, गडकरी नगरातील रस्त्यांचे डांबरीकरण 35 लाख 54 हजार 611, नवीन नगरपालिका भागातील पाण्याची टाकी ते कोटेचा हायस्कूल ते यावल रस्ता याचे डांबरीकरण करणे- 42 लाख 95 हजार 223 रूपयांची मंजुरी मिळाली आहे. या चारही रस्त्यांसाठी एकूण एक कोटी 81 लाख 98 हजार 767 रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.  यासोबत, नागरी दलीत्तेतर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत भुसावळातील प्रभाग क्रमांक सहा मधील भोळे कॉलनी भागातील बल्लाळेश्‍वर नगरापासून ते जळगाव रोड या मार्गावर तुटलेल्या गटारींची दुरूस्ती करणे 73 लाख 43 हजार 967, प्रभाग क्रमांक सहामध्ये शारदा नगर मेन रोडला लागून असलेले सोहम अपार्टमेंट पर्यंत तुटलेल्या गटारींची दुरूस्ती करणे 43 लाख, 91 हजार 335, प्रभाग क्रमांक सहामध्ये शारदा नगर, भोळे कॉलनी, भालोदकर प्लॉट, सपना नगर या भागांमध्ये रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच गुरूद्वार झोपडपट्टीत पेव्हर ब्लॉक बसविणे 53 लाख 24 हजार 629 आणि प्रभाग क्रमांक आठ खळवाडीमधील सुभाष बारकू पाटील यांच्या घरापासून संतोष गुजर, रवींद्र भोळे, ज्योती ट्रेडर्स पर्यंत आरसीसीची मोठी गटार बांधणे 22 लाख 48 हजार 372 रुपये अशी एकूण एक कोटी 93 लक्ष आठ हजार 300 रूपयांच्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शहरातील विकासकामांसाठी 3 कोटी 75 लाख सात हजार 70 रुपयांची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने व आमदार संजय सावकारे यांचा पाठपुराव्याने तसेच मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार यांच्या प्रशासकीय प्रस्तावांमुळे शहराच्या विकासासाठी हा निधी मिळाला आहे. त्यामुळे भुसावळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !