मनसुख हिरेन हत्या प्रकरण : मिठी नदी पात्रातून सीपीयुसह डीव्हीआरचे पार्टस् जप्त


मुंबई : मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना दुसर्‍यांना एनआयए न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. एनआयने बीकेसी परीसरात मिठी नदी पात्रातून सीपीयू, डिव्हीआरचे काही पार्टस, दोन नंबरप्लेट जप्त केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स अथवा इतर ठिकाणच्या नष्ट केलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा हा डीव्हीआर असण्याची शक्यता आहे. या तांत्रिक वस्तूंतून डेटा गोळा करून पुन्हा मिळवून जाऊन तो पुरावा म्हणून वापरला जाण्याची शक्यता आहे. यावेळी एनआयचे एसपी विक्रम खलाटे उपस्थित होते.

हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय
मनसुख हिरन यांची ठाण्याच्या गायमुख परीसरात हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याचा संशय आहे. एनआयएच्या तपासानुसार, 4 मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले. गायमुख येथे बराच वेळ त्यांचे वाहन थांबले होते. याच ठिकाणी त्यांची हत्या केल्याचा संशय एनआयएला आहे. तेथून त्यांचा मृतदेह रेतीबंदरच्या दिशेने नेण्यात आल्याचे बोलले जात आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !