चाकूचे वार करीत तरुणाची हत्या
नागपूर : कबूतर उडवण्याच्या कारणातून झालेल्या वादातून अक्षय सिद्धार्थ बागडे (25) या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी राजा उर्फ अरमान उर्फ अजहर जाफर शेख (27) यास अटक करण्यात आली. गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना शुक्रवारी रात्री घडली.गवळीपूर्यात दोघे शेजारी असलेल्यांमध्ये कबूतर उडविण्याच्या कारणावरून वाद होवून आरोपी राजा उर्फ अरमान शेखने अक्षय बागडेवर शस्त्राचे घाव घातल्याने त्याचा मृत्यूझाला. मृत बागडेची बहिण रोशनी रॉबिन साळवे (31) हिच्या तक्रारीवरून आरोपी राजा उर्फ अरमान शेख विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास आरोपी ताजबाग, सक्करदरामधून अटक करण्यात आली.