पोलिस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा !


पैसे खात नसलेला कर्मचारी-अधिकारीच पोलिस दलात नाहीच : माजी निवृत्त अधिकारी मीरा बोरवणकरांच्या दाव्याने उडाली राज्यात खळबळ ; महाराष्ट्राने केरळ, तेलंगणांकडून पोलिसींग शिकण्याचा दिला सल्ला

मुंबई : पोलिस दलात पैसे खात नाही असा अधिकारी, कर्मचारीच नाही, एकही पोलिस स्टेशन नाही की जिथे पैसे जमा होत नाहीत, असा धक्कादायक दावा निवृत्त पोलिस अधिकारी बोरवणकर यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. बोरवणकर म्हणाल्या की, एकही पोलीस स्टेशन नाही की, जिथे पैसे जमा होत नाहीत. प्रत्येक पोलिस स्टेशन राजकीय पक्षांची सोय आणि पैसे कमावण्याचा अड्डा झाला आहे. राजकारणी लोकांना हव्या तश्याच नियुक्त्या होतात. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेल्यानंतर परीस्थिती बिघडत गेल्याचे बोरवणकर म्हणाल्या.

वाझेंचे मागे मोठे पाठबळ
क्राईम ब्रँच हे खंडणी वसुली केंद्र झाले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून याची न्यायालयान चौकशी व्हावी, असे मत मीरा बोरवणकर यांनी मांडत वाझे यांनी हे एकट्याने केले असेल हे शक्य नाही. त्यांच्या मागे मोठे पाठबळ असेल असेही त्या एका प्रश्‍नाच्या उत्तरादाखल म्हणाल्या. महाराष्ट्राने केरळ, तेलंगणा या राज्यांकडून शिकावे, असा सल्लाबी बोरवणकर यांनी देत महाराष्ट्र पोलिस प्रशासनात वाईट प्रवृत्ती वाढल्या असून पोलिसींग पूर्ण संपल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. सर्व राजकीय पक्षांनी मिळून पोलिस दलाची रया घालवली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !