कोरोना रुग्णाचा स्वच्छतागृहात पडल्याने मृत्यू


औरंगाबाद : स्वच्छतागृहातच गेल्याने कोरोना रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली.रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.गुलाबराव ढवळे (65, रा. जयभवानीनगर) असे मयत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना 27 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होतानाच ऑक्सिजनची पातळी कमी होती. त्यामुळे ते ऑक्सिजनवर होते. दरम्यान सोमवारी पहाटे ते स्वच्छतागृहात गेले. त्यांना स्वच्छतागृहात जाऊन खूप वेळ झाला, तरीही ते बाहेर आले नसल्याची बाब अन्य रुग्ण, कर्मचार्‍यांच्या लक्षात आली. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा वाजविला. परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. परंतु सकाळी 7.40 वाजता गुलाबराव ढवळे यांचा मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !