औरंगाबादमध्ये आता 31 ते 9 एप्रिलदरम्यान लॉकडाऊन
औरंगाबाद : जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनचे सुधारित आदेश लागू करण्यात आले असून आता 31 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू असणार आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सकाळी आठ ते बारा या वेळेत सर्व पेट्रोल पंपांवर नागरिकांना पेट्रोल उपलब्ध राहणार आहे. तसेच हॉटेल्स सुद्धा रात्री आठ वाजेपर्यंत केवळ होम डिलिव्हरी देऊ शकतील असे सुधारित आदेशात म्हटले आहे.
परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सूट
यासोबतच पूर्वनियोजित परीक्षांसाठी हॉल तिकीट दाखवून विद्यार्थ्यांना प्रवेशाची सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पूर्वीच्या आदेशातील प्रतिबंधित आणि सूट देण्यात आलेल्या बाबी तशाच लागू असणार आहेत.







