नांदेडमध्ये पोलिस उपअधीक्षकांची गाडी फोडली : दहा पोलिस जखमी


नांदेड : नांदेडमध्ये दररोज कोरोनाचे एक हजार हून अधिक रुग्ण सापडत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे गुरुवारपासून टाळे बंदी करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ही आज शीख समाजाच्यावतीने हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला. त्यात 10 पोलीस जखमी झाले. संतप्त जमावाने पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडली. चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणार्‍या अनेकांचे मोबाइल यावेळी फोडण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सोमवारी सायंकाळनंतर ही घटना घडल्ली. शहरात या घटनेने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

परवानगीविनाच काढली मिरवणूक
नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणार्‍या शीख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती मात्र सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलिस तैनात होते. चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बॅरीकेटिंग तोडली.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !