धक्कादायक ! : राष्ट्रवादीच्या या नेत्यावर आता बलात्काराचा आरोप


राजेश विटेकर यांच्या अडचणीत वाढ : बंदुकीचा धाक दाखवून अत्याचाराचा दावा

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या राजेश विटेकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांनी एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पुण्यात पत्रकार परीषद घेऊन हे गंभीर आरोप लावले आहेत. दबावापोटी पोलिस राष्ट्रवादीच्या या नेत्यावर कोणताही गुन्हा दाखल करीत नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला आहे.

लग्नाच्या आमिषाने अत्याचार
पीडित महिलेच्या दाव्यानुसार, संशयीत राजेश विटेकर यांनी माझ्यासोबत अत्याचार केले, त्यांच्या आई विद्यमान जिल्हा परीषद अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून माझ्यावर वारंवार खोटे आरोप करण्यात येत आहे, गृहखातं आमचं आहे, सत्ता आमची आहे, माझ्याविरोधात गुन्हा दाखल करू शकणार नाही. बंदुकीचा धाक दाखवून, लग्नाचं अमिष दाखवून माझ्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषण करण्यात आले शिवाय गेल्या वर्षभरापासून मी या अत्याचाराविरोधात पोलिस स्टेशनला गेले, परंतु कोणीही माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. उडवा-उडवीची उत्तरं देण्यात आली. शरद पवार साहेब मला मुलगा मानतात, ते माझ्यावर गुन्हा दाखल होऊ देणार नाहीत, असं विटेकरांनी धमकावण्यात आलं असल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मी एक शिक्षिका असून माझ्यावर असे अत्याचार होत असतील, तर इतर अशिक्षित महिलांवर किती अन्याय होत असतील? असा प्रश्‍नही या महिलेने उपस्थित केला आहे. दरम्यान, राजेश विटेकर कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी भूमाता बिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !