लाच प्रकरणात महिला न्यायाधीशाला अटक


पुणे : 50 लाखांच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महिला न्यायाधीशाला अटक केल्याने खळबळ उडाली आहे. अर्चना दीपक जतकर (रा. मावळ) असे अटक केलेल्या महिला न्यायाधीशाचे नाव आहे. न्यायालयाने जतकर यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अटकेने उडाली खळबळ
लाच घेताना जानेवारीमध्ये खासगी महिला शुभावरी भालचंद्र गायकवाड ( 29) हिला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजारांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अर्चना जतकर यांना अटक करण्यात आली तर या प्रकरणात यापूर्वीच निलंबित पोलीस निरीक्षक अनिल ऊर्फ भानुदास जाधव याला अटक करण्यात आली होती. गायकवाड यांनी फिर्यादी यांच्याविरुद्धच्या केसमध्ये त्यांच्या बाजूने काम करुन देते असे म्हणाल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे संभाषण व्हाईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. गायकवाड हिने फिर्यादीप्रमाणेच आणखी 7 ते 8 जणांना जागेच्या वादासंदर्भात कोर्टातून निकाल लावून देते असे म्हणून संपर्क केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व जमिनीच्या संदर्भातील वाद जतकर यांच्या कोर्टामध्येच सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !