मनपाचा लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : तक्रारदाराला फ्लॅटसाठी पाण्याचे नळ कनेक्शन देण्यासाठी 35 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती सहा हजार सुरूवातीला स्वीकारल्यानंतर पुन्हा 2 एप्रिल रोजी पंचांसमक्ष दहा हजारांची लाच स्वीकारणार्या मनपा नाशिकमधील पंचवटी पाणी विभागाचा कनिष्ठ लिपिक संजय वनारसीभाई पटेल (45) यास 2 एप्रिल रोजी लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार सापळा यशस्वी
नाशिकमधील 40 वर्षीय तक्रारदार महिला असून प्लॅटमध्ये नळ कनेक्शन मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. नळ कनेक्शन देण्यासाठी आरोपीने 35 हजारांची मागणी करीत त्यावेळी सहा हजारांची लाच स्वीकारली होती शिवाय उर्वरीत रकमेपैकी 2 रोजी दहा हजार रुपये स्वीकारल्याने त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक एसीबीचे सहा.पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, हवालदार सचिन गोसावी, प्रकाश डोंगरे, अजय गरुड, प्रणय इंगळे आदींच्या पथकाने यशस्वी केला.







