तलावात बुडाल्याने दोन तरुणांचा मृत्यू


औरंगाबाद : तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गांधेली शिवारातील तलावात घडली. अतीक अकिल शेख (19) आणि नदीम नासेर शेख (17, दोघेही रा. नुरानी मशिदजवळ, गारखेडा) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघे रविवारी दुपारी परिसरातील आठ ते दहा मित्रांसह गांधेली शिवारातील बाबूभाई यांच्या शेतात जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून ते सर्वजण दुपारी 2 वाजेच्या सुमारास गांधेली गावात आले. तेथे बांधकाम सुरू असलेल्या मशिदीमध्ये सर्वांनी दुपारची नमाज अदा केली. तेव्हा अतिक व नदी हे दोघेजण घराकडे जातो म्हणून दुचाकीवर पुढे निघाले. नवीन बीड बायपास रोडलगत असलेला तलाव पाहून दोघांनी पोहोण्याचा बेत रचला. तलावाच्या काठावर कपडे ठेवून त्यांनी पाण्यात उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही तलावात बुडाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !