युवकाचा मृत्यू : तिघा आरोपींना अटक
अकोला : युवकाची हत्या केल्याप्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जठारपेठ चौकात ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. मोबाईल घेतल्याच्या कारणामुळेच ही हत्या झाल्याचे उघड झालीे आहे.
मोबाईल कारणावरून केली हत्या
अन्नपूर्णा अपार्टमेंट येथील रहिवासी सौरभ सुळे या युवकाने उमेश सुखदेवे याचा मोबाईल घेतल्याची माहिती उमेशला त्याच्या मित्रांनी दिली असलीतरी सौरभने कुणाचाही मोबाईत घेतला नव्हात मात्र नशेत असलेल्या उमेश सुखदेवे याने त्याचा साथीदार सुनील वाडेकर व अमोल वाघमारे (तिघेही राहणार लहान उमरीम यांना सोबत घेऊन नशेतच सौरभ सुळे या युवकावर हल्ला चढविला. लाथाबुक्क्यांनी प्रचंड मारहाण केल्याने तसेच पोटात लाथा मारल्यामुळे सौरभ सुळे यांचा फडके हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.







