कोरोना निर्बंधामुळे सुवर्ण बाजाराची चमक दुसर्या वर्षीही ‘फिकीच’
भुसावळ : जिल्ह्यासह राज्यात सातत्याने वाढणार्या कोरोना रुग्णांमुळे गतवर्षीदेखील लॉकडाऊन काळात आलेल्या अक्षय तृतीया सणावेळी शहरातील सुवर्ण बाजारबंद बंद ठेवण्यात आली तर यंदादेखील तीच परीस्थिती असल्याने ग्राहकांचा यंदा काहीसा हिरमोड झाला आहे. कोराना निर्बंधामुळे सुवर्णपेढ्या बंद असल्याने सलग दुसर्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण व्यवसाय ठप्प झाला असून लाखोंची यानिमित्ताने होणार्या उलाढालीला ब्रेक लागला आहे.
व्यवसाय बंद असल्याची खंत मात्र ग्राहक कोरोनामुक्त हवा : नाना विसपुते
आम्ही सुवर्ण व्यापारी शासनासोबत आहोत, सरकारच्या निर्णयामुळे व्यवसाय ठप्प झाला असलातरी त्याला पर्याय नाही. ग्राहक हा देवता तो कोरोनामुक्त व्हायला हवा ही आमची प्रार्थना आहे. व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा सलग दुसर्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुवर्ण पेढ्या बंद राहत असल्याची खंत वाटल्याचे भुसावळ सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव विसपुते म्हणाले.



