गोळीबार प्रकरण : अटकेतील तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी


पोलिसांनी गुन्ह्यातील दोन पिस्तूल केले जप्त

जळगाव : शहरातील शनिपेठेतील चौगुले प्लॉट भागात दोन गटात वाद होवून गोळीबाराच्या घटनेप्रकरणी बुधवारी विजय जयवंत शिंदे (23), राहुल अशोक शिंदे (22) व किशोर जयवंत शिंदे (20, तिघे. रा.चौघुले प्लॉट)म या तिघा भावंडांना बुधवारी अटक करण्यात आली. गुरुवारी तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता तिघांना 17 एप्रिल पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यात संशयित विजय शिंदे याच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आले असून त्यातील एका पिस्तूलातून त्याने घटनेच्या गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.

व्हॉटसअ‍ॅऍपवर स्टेटसच्या कारणावरुन उफाळला वाद
चौघुले प्लॉट येथे व्हॉटसअ‍ॅऍपवर स्टेटसच्या कारणावरुन तसेच जुना वाद उफाळून सारवान व शिंदे गटात वाद उफाळून गोळीबाराची घटना 11 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटाच्या परस्पर फिर्यादीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात दंगल व आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सोनू सारवान, निलेश हंसकर, लखन सारवान, सनी मिलांदे व पंकज चौधरी यांना अटक करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले, सहाय्यक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, नरेंद्र वारुळे, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, राहूल पाटील, तसेच शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षिक विठ्ठल ससे, पोलीस उपनिरिक्षक अमोल कवडे, सहाय्यक फौजदार सलीम पिंजारी, रविंद्र पाटील, परीस जाधव, गिरीश पाटील, अमोल विसपुते, अमित बाविस्कर, राहूल पाटील, राहूल घेटे, अनिल कांबळे, मुकूंद गंगावणे यांच्या पथकाने एकत्रित कारवाई करुन बुधवारी रात्री संशयित राहूल शिंदे, किशोर शिंदे व विजय शिंदे या तिघांना अटक केली होती. तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना 17 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेच्या दिवशी विजय शिंदे याने दोन पिस्तूल आणले होते. एक धाक दाखवायसाठी आणले होते. तर दुसरे फायरिंग करण्यासाठी आणले होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. ते दोघेही पिस्तूल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या गुन्हयात राकेश उर्फ लिंबू राक्या हा पसार असून त्याचाही पथकाकडून शोध घेतला जात आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !