सेल्फीच्या नादात सहा मुले बुडाली : वालदेवी प्रकल्पातील दुर्दैवी घटना
नाशिक : पिंपळद शिवारातील वालदेवी लघू पाटबंधारे प्रकल्पावर वाढ दिवस साजरा करण्यासाठी नऊ मुले गेल्यानंतर सहा मुले सेल्फीच्या या नादात बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. रात्री उशिरा एकाचा मृतदेह हाती लागला होता तर शनिवारी दिवसभर शोध कार्य सुरू असल्याची आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली. शुक्रवारी रात्री आरती बाबाराव भालेराव (वय 23) हिचा मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विद्यार्थी सिडकोतील मोरवाडी परीसरातून येथे आल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी शोध मोहिमेला वेग
शुक्रवारी रात्री एक मृतदेह सापडल्यानंतर शनिवारी दिवसभरात शोध मोहिम सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, वाडीवर्हे पोलिस, तहसीलदार यांच्यासह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल होते. दरम्यान, या घटनेत प्रदीप जाधव (रा. सिंहस्थ नगर) आणि सना मणियार (रा. टोयोटा शोरुमच्यामागे) हे बचावल्याचे सांगण्यात आले.







