कोरोना रोखण्यासाठी आता 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण
नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरीकांचे सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. व्हॅक्सीन तयार करणार्या कंपन्या आपला 50 टक्के पुरवठा केंद्राला करण्याचाही निर्णय घेण्यात आला. लसीकरणासाठी कोविनद्वारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. सोमवारी जारी आदेशानुसार, आठरा पेक्षा जास्त वय असलेल्यांना 1 मे 2021 पासून लस दिली जाणार आहे. व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना व्हॅक्सीनेशमध्ये प्राथमिकता दिली जाणार आहे.