यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना कोरोनाची लागण


यावल : यावलचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना शुक्रवारी कोरोनाची लागण झाली असून या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. कुटुंबीयातील सदस्यांची चाचणी मात्र निगेटीव्ह आल्याचे ते म्हणाले.

नगरसेवक पाटील घरीच कॉरंटाईन
नगरसेवक अतुल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, आपली कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली असून घाबरून जाण्याचे कारण नाही., सध्या डॉक्टरांच्या निगराणीत आपण घरातच कॉरंटाईन आहोत शिवाय कुटुंबीयांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांनी तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. कोरोना झाल्यानंतरच त्याची जाणीव व वेदना होतात त्यामुळे नागरीकांनी अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर निघावे अन्यथा घरातच सुरक्षीत रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !