रावेर पंचायत समितीत 50 बेडच्या कोरोना हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव पाठवा
रावेरात खासदार रक्षा खडसे व भाजपा जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे यांच्या सूचना
रावेर : कोरोनाचा प्रभाव वाढत असून प्रशासनातील जबाबदार अधिकार्यांनी आपसी समन्वय साधून जनसेवा करावी. रावेर पंचायत समितीत 50 बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव तत्काळ माझ्याकडे पाठवा, कोरोना सेंटरमध्ये नेहमी स्वच्छता ठेवा, ही माझी जबाबदारी नाही ती माझी जबाबदारी नाही, असे करत बसु नका, सर्व प्रशासकीय अधिकार्यांनी एकत्र येऊन कोरोनाविरुध्द लढा देण्याच्या सूचना खासदार रक्षा खडसे व भाजपा जिल्हाध्यक्षा आमदार राजूमामा भोळे यांनी कोरोना आढावा बैठकीत दिल्या.
भाजपा पदाधिकार्यांची आढावा बैठक
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता भाजपाच्या लोकप्रतिनिधीनी शुक्रवारी संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यात वाढते पेशंट कसे कमी होणार ? यावर उपाय-योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच येथील ग्रामीण रग्णालयात जास्तीत-जास्त बेड उपलब्ध करण्याच्या सूचना तसेच व्हेंटीलेटर सुविधादेखील तत्काळ सुरू करण्याच्या सूचना खासदार यांनी दिल्या व ऑक्सिजन सेंटरची पाहणी केली.



यांची होती उपस्थिती
दरम्यान बैठकीला जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, पंचायत समिती सभापती कविता कोळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पंचायत समिती सदस्य जितु पाटील, जुम्मा तडवी, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, सौरभ जोशी, संदीप सावळे, हरलाल कोळी, गोपाळ नेमाडे आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अपघाती मयतांच्या वारसांना मदत
किनगावजवळ ट्रक अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना खासदार रक्षा खडसे व आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते प्रत्येकी दोन लाखाची मदत पंतप्रधान सहायता निधीतून चेक स्वरुपात करण्यात आली.
आपसी समन्वय साधा खासदारांची ताकीद
कोविड सेंटर व ऑक्सिजन सेंटरवर सोयी-सुविधा पुरवतांना आपसी समन्वय साधा, जबाबदारी झटकू नका, अश्या शब्दात खासदार रक्षा खडसे यांनी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना ताकिद दिली. जेवण व सोई सुविधांवर लक्ष ठेवण्याची माझी जबाबदारी नसल्याचे बैठकीत तहसीलदार म्हणाल्यानंतर खासदारांनी त्यांना सुनावले.

