कुख्यात गुंडावर कारागृहात चौघांचा जोरदार हल्ला
नागपूर : कुख्यात गुन्हेगार व मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारावर चौघा गुंडांनी कारागृहात हल्ला चढवल्याची घटना रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास येथील मध्यवर्ती कारागृहात ही खळबळजनक घटना घडली. रोशन कयूम शेख (वय 31) असे जखमीचे नाव आहे. संशयीत आरोपी जतिन उर्फ जययोगेश जंगम (वय 18) , जेरान उर्फ बंटी जॉर्ज निकोलस (वय 22), विशाल नारायण मोहरले (वय 19) आणि अरनॉर्ल्ड उर्फ शेल्टीन क्रिस्टोफर (वय 19) यांच्यासोबत त्याची अनेक दिवसांपासून कुरबूर सुरू असताना रविवारी सकाळी उभयंतात वाद उफाळला. जीव धोक्यात असल्याचे पाहून रोशनने मदतीसाठी याचना करताच कारागृह रक्षक तसेच काही बंदीवान मदतीला धावल्याने त्यांनी रोशनची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. चारही संशयीत कुख्यात असल्याचे सांगण्यात आले.