पारस ललवाणींविरुद्ध तक्रार मागे घेण्यासाठी खंडणी भोवली : अल्पवयीन तरुणीच्या आईला अटक
जामनेर : जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेला खंडणीतील 50 हजार रुपयांची रक्कम लासलगाव येथील एका लॉजवर स्वीकारताना बुधवारी दुपारी लासलगाव पोलिसांनी अटक करताच जळगाव जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली. या गुन्ह्यात जामनेर येथील प्रफुल्ला लोढा व सुनील कोचर यांनाही सहआरोपी करण्यात आले. लासलगावचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाच मागताच दाखल केली तक्रार
श्रीरामपूर येथील एका तरुणीने आपल्या इच्छेविरुद्ध विवाह झाल्याने तसेच विनयभंग करण्यात आल्याने श्रीरामपूर पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी 2 मार्च 2021 रोजी तरुणीचा पती ऋषभ ललवाणी, चुलत सासरे व माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, चंदूलाल ललवाणी, सासरे विकास ललवाणी, सासूर भावना ललवाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तो शून्य क्रमांकाने जामनेर पोलिसात वर्ग करण्यात आला होता. दरत्यान, या गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्हा मागे घेण्यासाठी पीडीत तरुणीची आई ज्योती चंदूलाल कोठारी महिलेने ललवाणी कुटुंबियांकडून मागितली होती. ही रक्कम ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव येथील ऐश्वर्या लॉज या ठिकाणी द्यावे, असे ज्योती कोठारी यांनी सांगितले होते तर अल्केश झुंबरलाल ललवाणी यांनी लासलगाव पोलीस कार्यालयात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. खंडणीची रक्कम स्वीकारताच पोलिसांनी जप्त रकमेच्या नोटांचे क्रमांक नोंदवले तर प्रफुल्ल लोढा व सुनील कोचर यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले असून त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन करावयाचा असल्याचे सहा.निरीक्षक राहुल वाघ म्हणाले. दरम्यान, अटकेतील ज्योती कोठारी यांना पोलिस रीमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.


