नाशिक परीक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक पदाचा पदभार अश्वती दोर्जे यांच्याकडे
नाशिक : नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप आर.दिघावकर हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्याकडील रीक्त पदाचा पदभार अश्वती दोर्जे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, 30 रोजी दोर्जे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असून वरीष्ठांना याबाबत सूचित केले आहे.