सोलापूर-हावडा दरम्यान एकमार्गी (वन वे) अतिजलद विशेष गाड्या धावणार
भुसावळ : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णतः आरक्षित अतिजलद विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर – हावडा विशेष अतिजलद (वन वे)
01327 विशेष म्हणजे सोलापूर येथून दि. 3.5.2021 रोजी 1.30 वाजता सुटेल आणि हावडा येथे तिसर्या दिवशी 12.50 वाजता पोहोचेल. या गाडीला मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, रायगड, झारसुगुडा, राऊलकेला, चक्रधरपूर , टाटानगर, खरगपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



