आधी सासूशी घरोबा ; नंतर खटके उडताच केला खून


पुणे : प्रेमाला वय नसते हेच खरे ! कर्नाटकातील 26 वर्षीय जावयाचा 45 वर्षीय सासूवर जीव जडला अन् सासूला घेवून तो पुण्यात आला. इकडे पतीच्या लफड्याची माहिती पत्नीला कळताच तिने पतीला सोडले तर प्रेमात आकंठ बुडालेल्या 26 वर्षीय जावयाने सासूला घेवून बिबवेवाडीत वर्षभरापूर्वी संसार थाटला. सुरूवातीचे काही दिवस चांगले सुत जमले मात्र एकत्र राहत असताना त्यांच्यात वाद वाढत गेले. पुण्यात आल्यावर आरोपी आसीफ हा मिळेल ते काम करून घर चालवत होता. मात्र अनारकली (सासू) जेवण व्यवस्थित करत नसल्याची तक्रार करीत असल्याने व घरात खर्चासाठी पुरेसे देत नसल्याची तक्रार आसिफची सासू करत असे. शनिवारी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि जावयाने सासूचा गळा आवळून खून केला. या घटनेत अनारकली महम्मद तेरणे (45) हिचा मृत्यू झाला तरा आरोपी आसीफ दस्तगीर आत्तार (वय 26) आरोपी जावईचे नाव आहे. आरोपी पळण्याच्या बेतात असताना आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !