भुसावळातील प्रभाग 13 मध्ये रस्त्यांचे उजळले भाग्य


पाच वर्षांनी रस्त्यांच्या कामाने समाधान : नगरसेवकांचा यशस्वी पाठपुरावा

भुसावळ : शहरातील प्रभाग 13 तब्बल पाचमध्ये तब्बल पाच वर्षांनी रस्त्यांची कामे होत असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. सोमवारी पालिकेच्या माध्यमातून डांबरीकरणाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली. सोमवारी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. शहरातील प्रभाग 13 मधील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. यामुळे पालिका प्रशासनाबद्दल स्थानिक नगरसेवकांची नाराजी होती. आता या रस्त्याच्या कामाला मुहूर्त गवसला आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, नगरसेविका मंगला आवटे, नगरसेवक युवराज लोणारी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, मुकेश गुंजाळ, गिरीश महाजन, गोकुळ महाजन, जया फ्रांसिस मनी, विश्वनाथ इंगळे, किशोर टोके, गौरव आवटे, रवी लेकुरवाळे, योगेश वाघ आदी उपस्थित होते.

नागरीकांचा दिलेला शब्द खरा करणार : मंगला आवटे
आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पाठपुराव्यातून प्रभागात रस्त्यांची कामे होत आहेत. नागरीकांना निवडणुकीवेळी दिलेल्या विकासकामांचा शब्द निश्‍चित आपण खरा करू शिवाय प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी कटीबद्ध असल्याचे नगरसेवक मंगला आवटे म्हणाल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !