होमिओपॅथिक औषधे बेतली जीवावर : एकाच कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये होमिओपॅथिक औषधाच्या सेवनाने एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला तर पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा भयंकर प्रकार घडला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकार्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी ड्रोसेरा 30 हे होमिओपॅथिक औषध घेतलं होतं. ज्यामध्ये 91 टक्के अल्कोहोल होतं. हे औषध देणारा डॉक्टर पसार झाला आहे. पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.