आजाराला कंटाळून पाच वर्षीय चिमुकलीसह मातेची आत्महत्या
अक्कलकोट : अक्कलकोट शहरातील हत्ती तलावात माय-लेकीने आत्महत्या केली. रविवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुनीता संतोष गायकवाड (30) व आराध्या (5) अशी मयत माय-लेकांची नावे आहेत. याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. सुनीता ही मानसिक आजाराने त्रस्त असल्याची माहिती आहे. शनिवारी रात्री घरी सर्व जण झोपी गेल्यानंतर मुलगी आराध्या (5) हिला सोबत घेत विवाहितेने हत्ती तलाव गाठत आत्महत्या केली. रविवारी सकाळी मच्छीमारांना माय-लेकींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. याबाबत सविता गौतम मडीखांबे (32, रा. उत्कर्षनगर, अक्कलकोट) यांनी खबर दिली.


