दहा हजारांची लाच भोवली : मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : तक्रारदाराच्या शेत जमिनीची झालेल्या इ.टी.एस. मोजणीची साक्षांकित प्रत देण्यासाठी व तक्रारदारास त्यांच्या कामात मदत करण्यासाठी दहा हजारांची लाच मागणार्या शिंदेतील मंडळाधिकारी प्रशांत भास्कर घोडके (45) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली. आरोपी मंडळाधिकार्यांनी 23 जून रोजी दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. 24 रोजी घोडके यांनी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक अंतर्गत असलेल्या बिटको पोलीस चौकीसमोर लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, नाईक प्रकाश डोंगरे, नाईक प्रणय इंगळे, नाईक एकनाथ बाविस्कर, हवालदार प्रफुल माळी आदींनी हा सापळा यशस्वी केला.



